1. मनोरंजन
  2. बॉलीवूड
  3. सिनेगप्पा
Written By
Last Modified: गुरूवार, 23 ऑगस्ट 2018 (09:07 IST)

आमटे दांपत्य 'कौन बनेगा करोडपती' मध्ये

‘कौन बनेगा करोडपती’या रिअॅलिटी शोमध्ये अमिताभ बच्चन सुप्रसिद्ध समाजसेवक डॉ.प्रकाश आमटे व त्यांच्या पत्नी डॉ.मंदाकिनी आमटे यांच्या आयुष्यातील एकेक पैलू उलगडणार आहेत. अमिताभ यांनी केबीसीच्या दहाव्या पर्वाच्या शूटिंगला सुरुवात केली आहे. आतापर्यंत केबीसीमध्ये बॉलिवूड, क्रीडा व अन्य क्षेत्रांतील व्यक्तींना बोलावण्यात आले होते. या दहाव्या पर्वात समाजसेवक डॉ. प्रकाश आमटे व डॉ.मंदाकिनी आमटे उपस्थित राहणार आहेत. अमिताभ यांनी ट्विटरवरुन ही माहिती दिली आहे.  येत्या ७ सप्टेंबरला या भागाचं प्रक्षेपण केले जाणार आहे.
 
‘डॉ.प्रकाश बाबा आमटे व डॉ.मंदाकिनी आमटे या दोन असामान्य व्यक्तींचा सहवास लाभणं ही माझ्यासाठी आनंद व सन्मानाची बाब आहे. त्यांचं जीवन आणि आदिवासींसाठी केलेलं काम अत्यंत प्रेरणादायी आहे. आपण कल्पनाही करु शकत नाही, असं काम ते करताहेत. केबीसीच्या ‘कर्मवीर’भागाच्या निमित्तानं ते माझ्यासोबत होते’,असे अमिताभ यांनी ट्वीट केले आहे.