शुक्रवार, 16 जानेवारी 2026
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: शुक्रवार, 11 नोव्हेंबर 2016 (10:27 IST)

नोटा बदलण्यासाठी बँक आणि पोस्ट ऑफिसमध्ये तुफान गर्दी

bank
चलनातील 500 आणि 1000 रुपयांच्या नोटा रद्द झाल्यानंतर गुरुवारी सकाळी नोटा बदलण्यासाठी  बँक आणि पोस्ट ऑफिसमध्ये लोकांची तुफान गर्दी झाली आहे. सकाळी बँक उघडण्याआधीपासून लोकांच्या लांबच लांब रांगा होत्या. अजूनही बहुतांश एटीएम बंद आहेत. येत्या शनिवार आणि रविवारदेखील बँका सुरू असणार आहेत. याशिवाय नोटांच्या बदल्यात केवळ 100 रुपयांच्या नोटा मिळतील, अशी अपेक्षा करू नये. याबदल्यात चिल्लरही मिळू शकतात असे आवाहन बँकांकडून नागरिकांना करण्यात आले आहे.