शुक्रवार, 27 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: शुक्रवार, 10 डिसेंबर 2021 (07:38 IST)

भीक मागून पुरस्कार मिळवता येतो, स्वातंत्र्य नाही; कन्हैय्या कुमार

भीक मागून पुरस्कार मिळवता येतो, स्वातंत्र्य नाही, असे म्हणत वादग्रस्त अभिनेत्री कंगना रणौतच्या स्वातंत्र्यावरील वक्तव्यावर काँग्रेस नेते कन्हैय्या कुमार यांनी तिला चांगलेच फटकारले आहे. देशातील बदलती राजकीय व सामाजिक परिस्थिती यावर शहरात वार्तालापाचे आयोजन केले होत. त्यावेळी ते माध्यमांशी बोलत होते. यावेळी त्यांना कंगनाच्या वक्तव्यावर प्रश्न विचारण्यात आला होता.
 
देशाला स्वातंत्र्याचे लोकांनी दिलेल्या बलिदानातून त्यांनी केलेलया संघर्षातून मिळत असते. भीक म्हणून पुरस्कार मिळू शकेल. मात्र भीक म्हणून स्वातंत्र्य मिळणार नाही, असे कन्हैय्या कुमार म्हटले आहे. या प्रकारची विधाने ही मूळ मुद्द्याकडून देशाचे लक्ष भरकटवण्यासाठी केली जातात त्यामुळे याकडं पूर्ण दुर्लक्ष करणे गरजेचेआहे मी अश्या गोष्टींकडे पूर्णपणे दुर्लक्ष करतो. तुम्हीही याकडे दुर्लक्ष करा असे ते म्हणाले.
 
देशातील पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वावार भाष्य करताना त्यांनी देशात ‘वन मॅन शो चल रहा है’ असे म्हणत मोदी सरकारवर टीका केली. मात्र शेतकरी आंदोलनाच्या पुढे ही ५६ इंच छाती घाबरली. घाबरूनच कृषी कायदे मागे घेतले. शेतकऱ्यांना हे सरकार घाबरले, असे कन्हैया कुमार यांनी म्हटले आहे.