बुधवार, 25 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. आज-काल
  3. मागोवा 2018
Written By

भय्युजी महाराज यांनी स्वतःवर गोळी झाडून केली आत्महत्या

इंदूर- आध्यात्मिक गुरु भय्यु महाराज यांनी स्वत:ला गोळी झाडून आत्महत्या केली. इंदूर स्थित स्वत:च्या निवास स्थळी त्यांनी स्वत:वर गोळी झाडली. प्रारंभिक दृष्ट्या कौटुंबिक भांडणामुळे त्यांनी स्वत: ला गोळी मारली.
 
कोण आहे भय्यु महाराज
भय्यु महाराज यांचे वास्तिवक नाव उदयसिंह देशमुख असे आहे. इंदूर येथील बापट चौरस्त्यावर त्यांचे आश्रम आहे जिथून ते ट्रस्टचे सामाजिक कार्य संचालित करत होते. त्यांच्या पहिल्या पत्नीचे नाव माधवी होते. माधवी यांचे निधन झाले असून एक मुलगी कुहू आहे, जी हल्ली 
 
पुणे येथे शिक्षण घेत आहे. भय्यु महराज यांनी दुसरे लग्न डॉक्टर आयुषी यांच्यासोबत केले होते. आयुषी अनेक वर्ष त्यांच्या आश्रममध्ये सेवा करायची.
 
भय्यु महाराज यांची अनेक क्षेत्रात चांगली पकड होती. सिनेमा, राजकारण, समाजिक कार्य असे अनेक क्षेत्रांमध्ये ते सक्रिय असायचे. त्यांच्या आश्रमत व्हीआयपी संत येत असे.
 
भय्यु महाराज तेव्हा मीडियाच्या नजरेत आले जेव्हा अन्ना हजारे यांचे अनशन तोडवण्यासाठी क्रेंद सरकारने त्यांना दूत म्हणून पाठवले होते. नंतर अन्ना यांनी ज्यूस पिऊन अनशन सोडले होते. तसेच पीएम बनण्यापूर्वी गुजरातचे मुख्यमंत्री असताना मोदी सद्भावना उपवास करत होते तेव्हा त्यांचा उपास सोडवण्यसाठी देखील भय्यु महाराज यांना आमंत्रित केले गेले होते.