शुक्रवार, 24 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: शुक्रवार, 1 सप्टेंबर 2017 (11:54 IST)

भेंडीबाजार इमारत दुर्घटना, ३४ ठार

मुंबईतील भेंडीबाजार परिसरातील हुसैनीवाला ही सुमारे सव्वाशे वर्षे जुनी आणि धोकादायक जाहीर केलेली सहा मजली इमारत गुरुवारी सकाळी साडेआठच्या सुमारास कोसळली. या दुर्घटनेत आत्तापर्यंत ३४ जणांना आपला जीव गमवावा लागला आहे. तर पन्नासहून अधिक जण जखमी झाले. रात्रभर बचावकार्य सुरूच होते. यात 13 जणांना वाचवण्यात बचाव पथकांना यश आले आहे. अशी माहिती एनडीआरएफच्या अधिकाऱ्यांनी दिली.

या जीर्ण इमारतीला मंगळवारी अतिवृष्टीचा शेवटचा धक्का बसला व इमारत कोसळली, असा प्राथमिक अंदाज आहे. या दुर्घटनेची चौकशी करण्याचे आदेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले