बुधवार, 25 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: गुरूवार, 31 ऑगस्ट 2017 (17:13 IST)

ब्लू व्हेल गेमचा आखणीन एक बळी

ब्लू व्हेल गेममुळे तमिळनाडूमधील एका १९ वर्षीय मुलाने गुरुवारी आत्महत्या केली. पोलिसांच्या म्हणण्यानुसार, त्याच्या आत्महत्ये मागे ब्लू व्हेल गेमच आहे. मदुराईमधील कलाईनगर भागात विग्नेश राहतो. त्याच्या घरात आत्महत्येनंतर चिठ्ठी सापडली असून त्यामध्ये त्याने आपले शेवटचे म्हणणे मांडले आहे. तो म्हणतो ‘ब्लू व्हेल हा गेम नाही…एकदा तुम्ही यामध्ये शिरलात तर बाहेर येण्याचा कोणताच रस्ता नाही….’ याशिवाय त्याच्या हातावर ब्लू व्हेल माशाचा आकार कोरला असून, त्याखाली ब्लू व्हेल असे लिहिलेही आहे. विग्नेश बी. कॉमच्या दुसऱ्या वर्षाचा विद्यार्थी आहे. या गेममुळे होणारी हा तमिळनाडूमधील पहिला मृत्यू आहे.