बुधवार, 28 सप्टेंबर 2022
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By

बीएचयू हिंसाचार पूर्वनियोजित कट असल्याचा संशय : योगी

बनारस हिंदू विद्यापीठातील हिंसाचार हा पूर्वनियोजित कट असल्याचा संशय उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी व्यक्त केला आहे. या घटनेमागे समाजकंटकांचा हात आहे असे त्यांनी सांगितले आहे. या घटनेच्या मुळाशी जाऊन तपास करावा, पण विद्यार्थ्यांना कोणत्याही प्रकारचा त्रास होता कामा नये, अशा सूचना विद्यापीठ प्रशासनाला दिल्या असल्याचेही त्यांनी सांगितले.
 
बनारस हिंदू विद्यापीठातील विद्यार्थिनीच्या छेडछाडीच्या घटनेनंतर संतप्त विद्यार्थ्यांनी आंदोलन केले. आंदोलक विद्यार्थ्यांवर पोलिसांनी लाठीमार केला होता. या घटनेचे पडसाद उमटू लागले आहेत. या घटनेची नैतिक जबाबदारी स्वीकारून मुख्य पर्यवेक्षकांनी राजीनामा दिला आहे.