गुरूवार, 26 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By

बीएचयू घटना: राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचा मूकनिषेध

बनारस हिंदू विद्यापीठात विद्यार्थिनी आंदोलनात सैन्य जवान,पोलीस प्रशासनाने केलेल्या लाठीचार्ज व हल्ल्याविरुद्ध राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसने मूकनिषेध केला.
 
बनारस हिंदू विद्यापीठात विद्यार्थिनीच्या छेडछाडीविरोधात पुकारलेल्या आंदोलनात ह्या सरकारने विद्यार्थिनींवर सैन्य जवान आणि पोलिसांनी लाठीचार्ज करवला. देशाच्या इतिहासात प्रथमच विद्यार्थी आंदोलनात सैन्य कार्यवाही करण्यात आली. ह्या काळ्या घटनेचा राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस औरंगाबादच्यावतीने मूकनिषेध करण्यात आला.
 
यावेळी आंदोलनात प्रदेश सचिव अक्षय पाटील, शहराध्यक्ष मयूर सोनवणे, कार्याध्यक्ष अमोल दांडगे, डॉ.कपिल झोटिंग, अक्षय शिंदे, अमोल धांदरे, उमेश चव्हाण योगेश सोळंके,विजय वाकडकर, नितीन किर्तीशाही यांच्यासह बहुसंख्य कार्यकर्त्यांची उपस्थिती होती.