हनीप्रित दिल्लीतच असल्याची माहिती
बलात्कारी बाबा राम रहिमची मानलेली मुलगी हनीप्रित हिला पकडण्यासाठी पोलिसांनी विशेष पथक तयार केले तसेच रेड अॅलर्ट जारी केला, तिला फरार घोषित करण्यासाठी तयारीही सुरू केली, इतकंच नव्हे तर तिला पकडण्यासाठी नेपाळपर्यंत पोलिस जाऊन आले पण हनीप्रित दिल्लीतच बुरखाधारण करून फिरत असल्याची माहिती उघड झाली आहे.
एका सीसीटीव्ही फुटेजमधून ही माहिती मिळाल्याने पोलिसही चक्रावून गेले आहेत. हनीप्रित दिल्लीच्या ग्रेटर कैलाश पार्ट-2 मधील एक घरात लपून बसल्याची माहिती आहे.