सोमवार, 23 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: रविवार, 10 डिसेंबर 2023 (13:39 IST)

Bihar : 30 वेळा चाकूने वार करून तरुणाची निर्घृण हत्या

murder
बिहारमधील नवादा येथून एका महिला कॉन्स्टेबलच्या मुलाची निर्घृण हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. खून करण्यापूर्वी गुन्हेगाराने तरुणाच्या डोळ्यात मिरची पावडर टाकली. त्यानंतर त्याच्यावर चाकूने 30 वेळा वार केले. या घटनेचे सीसीटीव्ही फुटेज समोर आले आहे. ही घटना घडताच रस्त्यावर लोकांमध्ये दहशतीचे वातावरण निर्माण झाले. या संपूर्ण घटनाक्रमाच्या वेळी  कोणीही तरुणाला वाचवण्याचा प्रयत्न केला नाही. पोलीस या प्रकरणाचा तपास करण्यात व्यस्त आहेत.
 
मिळालेल्या माहितीनुसार, नवादा-कादिरगंज मार्गावरील केएलएस कॉलेजजवळ ही घटना घडली.  राहुल कुमार(20) असे मृत तरुणाचे नाव आहे. राहुल हा नगर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील शिवनगर मोहल्ला येथील वासुदेव साव यांचा एकुलता एक मुलगा होता. राहुलची आई मुंगेर तुरुंगात कॉन्स्टेबल म्हणून तैनात आहे. या घटनेनंतर संपूर्ण परिसरातहळहळ व्यक्त केली जात आहे. तरुणाच्या कुटुंबीयांनी सांगितले की, राहुलला कोणीतरी फोन करून कॉलेजच्या दिशेने बोलावले होते. तेथे ही घटना घडली.
 
मृत राहुल बनारस येथे शिकत होता. आई-वडिलांच्या म्हणण्यावरून तो छठपूजेला घरी आला. राहुलवर एकापाठोपाठ एक धारदार चाकूने 30 वार करण्यात आले, त्यामुळे त्याचा जागीच मृत्यू झाला. आरोपींनी आधी राहुलच्या डोळ्यात लाल मिरची पावडर टाकली आणि नंतर अंगावर चाकूने वार केल्याचे सीसीटीव्ही फुटेजमध्ये कैद झाली आहे. राहुलचा खून का झाला हे कळू शकलेले नाही. पोलीस या प्रकरणाचा तपास करण्यात व्यस्त आहेत.  सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे चाकूहल्ला करणाऱ्या व्यक्तीची ओळख पटवली जात आहे. ही हत्या का झाली, याचा शोध पोलीस घेत आहेत.
 
Edited by - Priya Dixit