शुक्रवार, 3 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: मंगळवार, 4 जुलै 2023 (17:24 IST)

Bikaner: महिला शिक्षिका अल्पवयीन विद्यार्थिनीच्या प्रेमात पडली, दोघीही घरातून पसार

love hands
राजस्थान मधील बिकानेरच्या श्रीडूंगरगड परिसरात एका खासगी शाळेतील अल्पवयीन विद्यार्थिनींच्या प्रेमात शाळेतील शिक्षिका प्रेमात पडली.  आम्ही समलिंगी आहोत एकमेकांशिवाय राहता येणार नाही. हा व्हिडिओ बिकानेरच्या श्रीदंगरगड येथील एका तरुणीने बनवला आहे. ही मुलगी तिच्याच महिला शिक्षिकेसह घरातून निघून गेल्याचे सांगण्यात येत आहे, यानंतर मुलीच्या कुटुंबीयांनी पोलीस प्रशासनाविरोधात निदर्शने करत मुलीला एका विशिष्ट समाजातील महिला शिक्षिकेने फूस लावल्याचा आरोप केला आहे.- तिला आमिष दाखविण्यात आले आहे. ही बातमी समजताच तरुणी आणि महिला शिक्षिकेने व्हिडिओ बनवून आपल्या प्रेमाची माहिती दिली.

मुलीने आपल्या कुटुंबीयांची माफी मागताना शिक्षकाच्या कुटुंबावर कोणतीही कारवाई करू नये अशी विनंती करत व्हिडीओ टाकला आहे. या व्हिडीओ मध्ये त्यांनी आपले एकमेकांवरील असलेल्या प्रेमाची कबुली दिली आहे. आम्हाला जगू द्या. अशी विनंती केली आहे. आम्ही एकमेकांसोबत आनंदी असल्याचे त्यांनी म्हटले आहे. 
 
श्रीडुंगरगड येथील शिक्षकासोबत घर सोडलेली मुलगी अल्पवयीन आहे, सध्या पोलिसांनी एफआयआर नोंदवला असून या प्रकरणाचा तपास सुरू आहे. आता लोक या व्हिडिओवर आपापल्या पद्धतीने प्रतिक्रिया देत आहेत.या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे. 


Edited by - Priya Dixit