मंगळवार, 24 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: मंगळवार, 22 ऑक्टोबर 2019 (07:45 IST)

साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांचा पुन्हा नवा वाद

महात्मा गांधीजी हे राष्ट्रपुत्र असल्याचे वक्तव्य करून भाजप खासदार साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांनी पुन्हा एकदा नव्या वादाला सुरुवात केली आहे. महात्मा गांधीजी यांच्या १५० व्या जयंतीनिमित्त भाजपकडून मध्य प्रदेशात गांधी संकल्प यात्रा काढण्यात आली होती. मात्र, साध्वी प्रज्ञासिंह या यात्रेत सहभागी झाल्या नव्हत्या. याविषयी प्रसारमाध्यमांकडून विचारणा केली असता साध्वी प्रज्ञा यांनी म्हटले की, गांधीजी हे राष्ट्रपुत्र होते. मी त्यांच्या कार्याची प्रशंसा करते. 
 
ज्यांनी देशासाठी काम केले आहे असे सर्वजण माझ्यासाठी आदरणीय आहेत. महात्मा गांधींनी सांगितलेल्या मार्गावर मी कायम चालत राहीन. ज्या लोकांनी आपल्याला मार्गदर्शन केले त्यांचे आपण निश्चितच आभार मानायला हवेत असेही साध्वी यांनी सांगितले.