शुक्रवार, 26 एप्रिल 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By

राहुल गांधी यांची सरकारवर टीका

शेतकरी आत्महत्या, वाढलेली बेरोजगारी, पंजाब-महाराष्ट्र बँकेतील घोटाळ्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस गप्प का? असा सवाल उपस्थित करून भाजपा महत्वाच्या मुद्द्यावरून लक्ष हटवण्यासाठी इतर मुद्दे पुढे करून जनतेची दिशाभूल करत असल्याची घणाघाती टीका राहुल गांधी यांनी केली आहे. चांदिवलीच्या प्रचारसभेत बोलत होते. 
 
“डॉ. मनमोहनसिंग यांच्या कार्यकाळात देशाची अर्थव्यवस्था मजबूत होती. परंतु पाच वर्षात मोदींनी देशाची अर्थव्यवस्था मोडीत काढली. गुंतवणूक करण्यात कोणी धजावत नाही. नोटाबंदी, जीएसटीमुळे छोटे व्यापारी उद्धवस्थ झाले आहेत. पुणे येथील वाहन उद्योगही बंद पडत आहेत. मारूतीनेही उत्पादन कमी केले आहे. हजारो कामगार बेरोजगार होत आहेत. ४० वर्षांतील सर्वात मोठी बेरोजगारी झाली आहे. तरुणांच्या हाताला काम नाही आणि नरेंद्र मोदी मात्र त्यांना चांद्रयान दाखवत आहेत.”, अशी टीका राहुल गांधी यांनी केली.
 
पंजाब आणि महाराष्ट्र बँकेतील घोटाळ्याच्या मुद्द्यावरही राहुल गांधी यांनी जोरदार हल्लाबोल केला. या बँकेचे संचालक कोण होते? हे संचालक कोणाचे नातेवाईक आहेत? यावर मोदी फडणवीस का बोलत नाहीत ? मोठ्या उद्योगपतींचा १.२५ लाख कोटींचा कार्पोरेट टॅक्स मोदींनी माफ केला परंतु गरिबांचे किती पैसे माफ केले, असा सवाल राहुल गांधी यांनी उपस्थित केला.