संबंधित माहिती
- जम्मू काश्मीरच्या अनंतनागमध्ये सुरक्षादलावर दहशवाद्यांचा हल्ल्यात 10 जण गंभीर जखमी
- बिअर प्यायल्यानंतर आईने मारहाण केली, अल्पवयीन मुलाने पोलिसांच्या मदतीसाठी हाक मारली
- आता सियाचीन ग्लेशियर पाहायला जाणे शक्य
- दिल्लीसह उत्तर भारतात भूंकपाचे धक्के जाणवले
- राम मंदिराच्या मुद्द्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पहिल्यांदाच जाहीर सभेत भाष्य, शिवसेनेवर टीका
एअर इंडिया विमान कंपनीने 'त्या' केटररला केला दंड
राष्ट्रवादीच्या राज्यसभा खासदार वंदना चव्हाण यांच्या जेवणात अंड्याचं कवच आढळल्यामुळे एअर इंडिया विमान कंपनीने संबंधित केटररला दंड केला आहे. पुणे-दिल्ली फ्लाईटमध्ये देण्यात आलेल्या ऑमलेटमध्ये अंड्याचं कवच आढळल्याची तक्रार चव्हाण यांनी रविवारी केली होती. यावेळी विमानात आपल्याला दिलेल्या ऑमलेटमध्ये अंड्याच्या कवचाचे तुकडे सापडल्याचा दावा त्यांनी केला होता. तसे फोटो ट्वीट करत वंदना चव्हाण यांनी संताप व्यक्त केला होता.
एअर इंडियाच्या विमानात पुरवल्या जाणाऱ्या अन्नपदार्थाच्या दर्जाबाबत चव्हाण यांनी नाराजी व्यक्त केली. ‘काही दिवसांपूर्वी भल्या सकाळी एअर इंडियाच्या फ्लाईटने पुण्याहून दिल्लीला जात होते. ब्रेकफास्टला मी ऑमलेट मागवलं. तीन-चार घास खाऊन झाल्यावर अंड्याच्या कवचाचे तुकडे त्यात दिसले’ असं ट्वीट वंदना चव्हाण यांनी रविवारी केलं.