1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By

आता सियाचीन ग्लेशियर पाहायला जाणे शक्य

Now you can visit the Siachen Glacier
भारतीय सैन्यदल आता समुद्रसपाटीपासून जास्त उंचीवर असणाऱ्या काही सैन्यदलांच्या तळांवर जाण्याची मुभा देशवासियांना, पर्यटकांना देणार आहेत. ज्यामध्ये सियाचीन ग्लेशियरचाही समावेश असेल. 
 
लष्करप्रमुख बिपीन रावत यांनी नुकतच एका चर्चासत्रामध्ये याचा उल्लेख केला. यामध्ये काही लेफ्टनंट जनरल अधिकाऱ्यांचीही उपस्थिती होती. अधिकृत सुत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, भारतीय सैन्यदलाच्या काम करण्याच्या पद्धती आणि त्यांच्या कारवायांविषयी असणाऱ्या कुतूहलात वाढ झाली आहे, असंही लष्करप्रमुख म्हणाले.