testwebdunia1
testwebdunia0
testwebdunia2

केबीसी मधून फोन २५ लाख रुपयांचा जॅकपॉट आणि लाखो रुपयांची फसवणूक

Last Modified गुरूवार, 19 सप्टेंबर 2019 (10:22 IST)
कोणत्याही फसवणूकसाख्या फोन वर, ईमेलवर विश्वास ठेवू नका असे पोलीस नेहमीच सांगतात. मात्र तरीहि नागरिक विश्वास ठेवतात आणि आर्थिक मोहाला बळी पडतात व नुकसान करवून घेतात, असाच प्रकार नालासोपारा येथे घडला आहे. केबीसी अर्थात कौन बनेगा करोडपती या शोच्या नावाखाली भामट्याने एकाला आर्थिक गंडा घातल्याची घटना घडली आहे.
मूळचा बिहार यथील दरभंगाचा रहिवासी असलेला 15 वर्षाचा मनीष देवेंद्र सध्या मुंबई येथील नालासोपारा येथे वास्तव्यास आहे. त्याला 1 ऑगस्ट रोजी
एका अनोळखी इसमाचा फोन आला, त्या फोनवरुन त्याला कौन बनेगा करोडपतीच्या माध्यमातून 25 लाखांचा जॅकपॉट लागला असे सांगण्यात आले होते, त्यासाठी तुम्हाला 25 हजार आगाऊ भरावे लागतील असे कळवले. तरुणाने विश्वास ठेवत ही घटना तरुणाने आपल्या आईला सांगितली आणि त्यांनी दिलेल्या बँक खात्यात त्याने पैसे पाठवले. मात्र त्यानंतर पुन्हा त्याला 1 सप्टेंबर रोजी फोन आला आणि जीएसटी आणि इतर प्रोसेसिंग फीसाठी 60 हजार रुपये पुन्हा मागितले गेले, तेही त्याने भरले बँकेत भरले. काही पैसे त्याने आपल्या गावातून भरले. असे करत या टोळीने लॉटरीच्या नावाखाली त्याच्याकडून जवळपास 3 लाख 92 हजार रुपये उकळले होते. मात्र जेव्हा पैसे भरल्यानंतरही 25 लाख मिळत नाहीत हे लक्षात आल्यावर त्याने आलेल्या नंबरवर संपर्क केला. पण समाधानकारक उत्तर मिळत नसल्याने शेवटी आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आले, मग त्याने पोलीस स्टेशनमध्ये जाऊन तक्रार दाखल केले. टीव्ही कार्यक्रमाच्या नावाखाली नागरिकांना फोन करुन पैशाचे अमिष दाखवले जाते. त्यात नागरिकांची फसवणूक होते. त्यामुळे प्रत्येकाने असे फोन आल्यास सावध राहा, असं आवाहन पोलिसांनी नागरिकांना केले आहे.


यावर अधिक वाचा :

मोदी आणि शाह झोपेत सुद्धा माझं नाव घेतात : शरद पवार

मोदी आणि शाह झोपेत सुद्धा माझं नाव घेतात : शरद पवार
“पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शाह यांना माझ्याशिवाय राहवत नाही. ते ...

यात चुकीचे काय?, उदयनराजे यांचा सवाल

यात चुकीचे काय?, उदयनराजे यांचा सवाल
छत्रपती शिवाजी महाराजांचे वंशज उदयनराजे भोसले यांनी गड किल्ल्यांना लग्नसमारंभांसाठी भाडे ...

देशाला आदित्यसारख्या युवा नेत्याची गरज : संजय दत्त

देशाला आदित्यसारख्या युवा नेत्याची गरज : संजय दत्त
बॉलिवूड अभिनेता संजय दत्त याने युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांना पाठिंबा दिला आहे. संजय ...

फ्लिपकार्ट आता मनोरंजन क्षेत्रात

फ्लिपकार्ट आता मनोरंजन क्षेत्रात
ई-कॉमर्स कंपनी फ्लिपकार्टने ‘फ्लिपकार्ट व्हिडिओ ओरिजिनल्स’ नावाचे एक नवे व्हिडीओ ...

'या' वेळेत एक्झिट पोल दाखवता येणार नाहीत

'या' वेळेत एक्झिट पोल दाखवता येणार नाहीत
भारतीय निवडणूक आयोगाने विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर एक्झिट पोलवर बंदी घातली आहे. ...

Ayodhya: पूर्ण घटनाक्रम

Ayodhya: पूर्ण घटनाक्रम
1813 : हिंदू संघटनांनी पहिल्यांदा दावा केला की 1528मध्ये बाबरचा सेनापती मीर बंकी यांनी ...

राहुल गांधी यांची सरकारवर टीका

राहुल गांधी यांची सरकारवर टीका
शेतकरी आत्महत्या, वाढलेली बेरोजगारी, पंजाब-महाराष्ट्र बँकेतील घोटाळ्यावर पंतप्रधान ...

पोलीस अधिकाऱ्याचा रशियन महिलेवर बलात्कार, बहिण भावाचा खून, ...

पोलीस अधिकाऱ्याचा रशियन महिलेवर बलात्कार, बहिण भावाचा खून, प्रकरणाचे गूढ वाढले
मुंबई येथे मोठी घटना समोर आली आहे. एका रशियन नागरिक असलेल्या महिलेने तिच्यावर एका पोलीस ...

रस्त्याच्या कडेला झोपलेल्या भाविकांना बसने चिरडले

रस्त्याच्या कडेला झोपलेल्या भाविकांना बसने चिरडले
उत्तर प्रदेशच्या बुलंदशहरामध्ये भीषण अपघाताची घटना समोर आली आहे. रस्त्याच्या कडेला ...

राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांचे नाशकात आगमन

राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांचे नाशकात आगमन
भारताचे राष्ट्रपती श्री. रामनाथ कोविंद यांचे नाशिक येथील ओझर विमानतळावर आज सायंकाळी 07 ...