'त्या' गुहेचे बुकिंग हाऊसफुल्ल

narendra modi kedharnath
लोकसभा निवडणुकीपूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केदारनाथ येथील मंदिर परिसरातील एका गुहेत ध्यानधारणा केली होती. त्यानंतर ध्यानधारणेसाठी विशेषरित्या विकसित करण्यात आलेल्या या गुहेचा तपशील समोर आला होता. आता या गुहेचे बुकिंग हाऊसफुल्ल झाले आहे.
ऑक्टोबर महिन्यापर्यंत गुहेत ध्यानधारणा करण्यासाठी लोकांनी जागा आरक्षित केल्याचे समजते. या माध्यमातून आतापर्यंत गढवाल मंडल विकास निगमला ९५ हजारांचे उत्त्पन्न मिळाले आहे. गढवाल मंडल विकास निगमतर्फे (जीएमव्हीएन) गेल्यावर्षीपासून केदारनाथ येथे या गुहेची सोय करून देण्यात आली होती. केदारनाथ मंदिराच्या वरच्या बाजूला एक किलोमीटर अंतरावर ही गुहा आहे. विशेष म्हणजे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीच केदारनाथ मंदिराच्या परिसरात अशाप्रकारे गुहा तयार करण्याची कल्पना सुचविली होती. सुरूवातीला या गुहेत राहण्याचे एका दिवसाचे भाडे ३००० रूपये इतके होते. तसेच ही गुहा किमान तीन दिवसांसाठी भाड्याने घेण्याची अट होती. मात्र, पर्यटकांकडून मिळणारा अल्प प्रतिसाद पाहता हे भाडे ९९० रूपयांपर्यंत कमी करण्यात आले होते. सध्या या गुहेत ध्यानधारणा करण्यासाठी प्रतिरात्र १५०० आणि प्रतिदिन ९९० रूपये मोजावे लागतात.


यावर अधिक वाचा :

CSKच्या चाहत्यांनी धोनीला लिहिलं पत्र, कारण जाणून घ्या...

CSKच्या चाहत्यांनी धोनीला लिहिलं पत्र, कारण जाणून घ्या...
आयपीएलमध्ये (IPL 2020) चेन्नई विरुद्ध कोलकाता यांच्याच झालेला सामना CSKने 10 धावांनी ...

चिंता नको, आयडॉलच्या न होऊ शकलेल्या पुढील सर्व परीक्षा १९ ...

चिंता नको, आयडॉलच्या न होऊ शकलेल्या पुढील सर्व परीक्षा १९ ॲाक्टोबर २०२० पासून
तांत्रिक अडचणींमुळे आयडॉलच्या न होऊ शकलेल्या पुढील सर्व परीक्षा १९ ॲाक्टोबर २०२० पासून ...

हवाई दल दिनाच्या दिवशी मोदींनी देशातील शूर योद्ध्यांना सलाम ...

हवाई दल दिनाच्या दिवशी मोदींनी देशातील शूर योद्ध्यांना सलाम केला
नवी दिल्ली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुरुवारी देशाच्या शौर्य योद्धांना 88व्या भारतीय ...

सीबीआयचे माजी संचालक अश्विनी कुमार यांची आत्महत्या

सीबीआयचे माजी संचालक अश्विनी कुमार यांची आत्महत्या
सीबीआयचे माजी संचालक व नागालँडचे माजी राज्यपाल अश्विनी कुमार (६९) यांचा मृतदेह सिमला ...

भाजप नेत्याविरुद्ध सुनेने केला विनयभंगाचा गुन्हा दाखल

भाजप नेत्याविरुद्ध सुनेने केला विनयभंगाचा गुन्हा दाखल
दौंडमधील भाजपचे नेते तानाजी संभाजी दिवेकर यांना विनयभंगाच्या प्रकरणात अटक करण्यात आली ...

पंतप्रधान मोदी दोन दिवसांच्या दौर्‍यावर गुजरातमध्ये दाखल ...

पंतप्रधान मोदी दोन दिवसांच्या दौर्‍यावर गुजरातमध्ये दाखल झाले, सरदार पटेल प्राणिशास्त्र उद्यानाचे उद्घाटन करतील
पंतप्रधान नरेंद्र मोदी शुक्रवारी दोन दिवसांच्या गुजरात दौर्‍यावर गुजरातमध्ये दाखल झाले. ...

लष्कराने व्हॉट्सअ‍ॅप सारखे स्वदेशी मेसेजिंग एप 'SAI' ...

लष्कराने व्हॉट्सअ‍ॅप सारखे स्वदेशी मेसेजिंग एप 'SAI' बनविले, जाणून घ्या सिक्युअर कम्युनिकेशनमध्ये काय खास असेल
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या 'स्वावलंबी भारत' अभियानाला पुढे नेऊन भारतीय लष्कराने ...

अधिकार्‍यांवर संतापलेले नितीन गडकरी म्हणाले- ज्यांचे काम ...

अधिकार्‍यांवर संतापलेले नितीन गडकरी म्हणाले- ज्यांचे काम लांबणीवर पडले आहे त्यांची छायाचित्रे लटकवा
केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी पुन्हा एकदा कामावरील विलंब ...

गुजरातचे माजी मुख्यमंत्री आणि भाजपचे ज्येष्ठ नेते केशुभाई ...

गुजरातचे माजी मुख्यमंत्री आणि भाजपचे ज्येष्ठ नेते केशुभाई पटेल यांचं निधन
कोरोना काळात भाजप आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींना (narendra modi) मोठा धक्का बसला आहे. ...

अखेर मान्सूनचा परतीचा प्रवास संपला

अखेर मान्सूनचा परतीचा प्रवास संपला
यंदा देशात सरासरीच्या 109 टक्के पाऊस बरसला