शुक्रवार, 10 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By

चंद्रकांता मालिकेच्या दिग्दर्शकाच्या मुलाने सहा वर्षाच्या मुलाचे चुंबन घेतले, केस दाखल

चंद्रकांता आणि श्रीमान-श्रीमती या प्रसिद्ध मालिका दिग्दर्शित करणार्‍या नीरजा गुलेरीच्या 45 वर्षाच्या मुलाने लोध गार्डनमध्ये एका सहा वर्षाच्या मुलाचे चुंबन घेतले. मुलाच्या वडिलांना यावर आक्षेप घेतला आणि दिल्लीच्या तुगलक रोड ठाणा पोलिसात त्याच्या विरुद्ध केस दाखल करण्यात आला आहे.
 
आता आरोपीला अटक केली गेली नाही. पोलिस अधिकार्‍यांप्रमाणे आरोपी मानसिक रूपाने कमजोर आहे. मेडिकल तपासणीनंतर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. दिल्ली या प्रकाराचे हे पहिले प्रकरण आहे.
 
ही घटना रविवारी सकाळी आठ वाजता लोधी गार्डनमध्ये घडली. पीडित मुलाचे वडिल वकील असून कुटुंबासह गार्डनमध्ये फिरायला आले होते. ते कारमधून काही सामान काढण्यासाठी गार्डनमधून बाहेर पडले तोपर्यंत एका 45 वर्षीय व्यक्तीने मुलाचे चुंबन घेयला सुरू केले. तेवढ्यात मुलाचे वडील गार्डनमध्ये आले आणि त्यांनी यावर आक्षेप घेतला. त्यांनी या प्रकरणाची सूचना पोलिसात दिली. तक्रारीवर पोक्सो अॅक्ट अंतर्गत प्रकरण दाखल करण्यात आले आहे.
 
आरोपी साहिल गुलेरी याच्यासोबत दोन-तीन गार्ड देखील होते. ते त्याला सफदरजंग एंक्लेव्ह स्थित घराहून लोधी गार्डन फिरवण्यासाठी आले होते. पोलिस अधिकार्‍यांप्रमाणे कुटुंबातील लोकांचा दावा आहे की साहिलची तब्येत ठीक नसते आणि तो मानसिक रूपाने कमजोर आहे.