आता टीव्ही बघणे होईल स्वस्त, ट्राय उचलणार मोठे पाऊल
ग्राहकांच्या सुविधेसाठी टेलिकॉम रेगुलेटर ट्राय (TRAI) च्या नियमांमध्ये बदल होत असतो. आता ट्राय एक मोठे पाऊल उचलेल अशी शक्यता वर्तवली जात आहे. याने ग्राहकांना फायदा होईल. जाणून घ्या कसे:
आपण टीव्हीच्या बिलमुळे परेशान असाल तर आता काळजी करण्याची गरज नाही. कारण ट्राय एक कंसल्टेशन कागदपत्र जारी करण्याचा विचार करत आहे. याने ग्राहकांना फायदा होईल कारण त्यांना टीव्हीचे कमी बिल भरावं लागेल.
या संदर्भात एका अधिकार्याने सांगितले की कंसल्टेशन पेपर द्वारे टीव्ही बिल कमी करण्यात येईल. टॅरिफ कमी करण्यासाठी कोणते पर्याय योग्य ठरतील यावर विचार सुरू आहे.
अलीकडेच बातमी आली होती की भारतीय दूरसंचार नियामक प्राधिकरण (ट्राय) ते अॅप्स नियंत्रित करेल ज्यांवर टीव्ही चॅनल्स लाइव्ह स्ट्रिमिंग करतात. देशात हे अॅप्स चालवण्यासाठी कंपन्यांना ट्रायकडून लायसेंस घ्यावं लागेल.
हे अॅप्स करतात चॅनल स्ट्रिमिंग
मोबाइल अॅप्स जसे हॉटस्टार, एअरटेल टीव्ही, जिओ टीव्ही, सोनी लिव्ह, एमएक्स प्लेयर, जी5 अनेक चॅनल्सची लाइव्ह स्ट्रिमिंग करतात. आता यांना देखील ब्रॉडकास्टिंग कंपन्यांप्रमाणे लायसेंस घ्यावं लागेल.
मोफत होते स्ट्रिमिंग
सध्या या मोबाइल अॅप्सवर टीव्ही चॅनल्सची स्ट्रिमिंग मोफत होते. हे अॅप्स ट्राय नियंत्रण करत नाही. ट्राय प्रमाणे त्याने ब्रॉडकास्टिंग कंपन्यांना लायसेंस दिले आहे की त्याने आपलं कंटेट केबल ऑपरेटर किंवा डीटीएच कंपन्यांना द्यावे. परंतू मोबाइल अॅप्स जसे तिसरी पार्टी मोफत चॅनल्स दाखवत तर चुकीचे आहे. म्हणून आता या मोबाइल अॅप्सला देखील लायसेंस घ्यावे लागणार.
ट्राय जुलै-ऑगस्ट दरम्यान एक ड्राफ्ट आणून लोकांकडून सल्ला मागणार. तरी मोबाइल अॅप चालवणार्या कंपन्यांप्रमाणे ट्रायला असे काही करण्याचा हक्क नाही. असे अॅप्स आयटी अॅक्ट अंतर्गत येतात. याने कंपन्यांवर नकारात्मक प्रभाव पडेल.
ग्राहकांवर प्रभाव
जर ट्रायने हे मोबाइल अॅप्स लायसेंसच्या मर्यादेत घेतले तर लोकं फ्रीमध्ये कोणतेही चॅनल बघू शकणार नाही. प्रत्येक अॅपसाठी आपल्याला पैसे मोजावे लागतील. हे महागात पडू शकतं. ट्रायच्या या पाउलामुळे लोकं मोबाइलवर टीव्ही बघणे बंद करू शकतात. सध्या मेट्रो सिटीजमध्ये लोक आपले आवडते प्रोग्राम मोबाईल अॅपवर बघणे पसंत करतात.