बुधवार, 27 नोव्हेंबर 2024
  1. मनोरंजन
  2. हास्यकट्टा
  3. व्हॉट्सअप मॅसेजेस
Written By
Last Modified: बुधवार, 15 मे 2019 (16:56 IST)

मुंबईतील ट्रेन मधील लोकांच्या सहकार्याचा मजेदार किस्सा

काही दिवसांपूर्वी दादरला ठाण्याला जाण्यासाठी ट्रेन मधे चढलो. माझ्या मागोमाग एक तरुणही चढला. तो बाहेरून प्रथमच मुंबईत आला असावा कारण तो विचारु लागला "मुलुंड कधी येईल मला उत्तरायचंय." लोकांनी सांगितलं की "ही फास्ट गाडी आहे ही मुलुंडला थांबत नाही". बिचारा घाबरला. लोकांनी सांगितलं की "घाबरू नको एक कर, ही गाडी मुलुंडला स्लो होते तेंव्हा तू धावत्या गाडीतून उतार व गाडी ज्या दिशेला जाते त्या दिशेला थोडा धाव म्हणजे तू पडणार नाहीस". झालं, ठरल्या प्रमाणे त्याला दारात उभं केलं, गाडी मुलुंड ला स्लो झाली तेंव्हा तो स्टेशन वर उतरला आणि ठरल्याप्रमाणे धावला, पण तो इतका जोरात धावला की पुढच्या डब्याजवळ गेला. तिथल्या लोकांनी त्याला धरून आत घेतला व सांगितलं, "तुझं नशीब बलवत्तर म्हणून तुला ही गाडी मिळाली, ही फास्ट ट्रेन आहे. मुलुंडला थांबत नाही."