मंगळवार, 12 ऑगस्ट 2025
  1. मनोरंजन
  2. मराठी सिनेमा
  3. नाट्य-चित्र गप्पा
Written By
Last Modified: बुधवार, 8 मे 2019 (18:37 IST)

अभिनेता प्रियदर्शन जाधव झाला ट्रोल

actor
मराठी अभिनेता प्रियदर्शन जाधव यानेही सोशल मीडियाच्या माध्यमातून पंतप्रधानांवर टीका केली. 'राजीव गांधी यांच्याविषयीच्या विधानानंतर तर पूर्णपणे मनातून उतरलात', असं त्याने ट्विटमध्ये लिहिलं. सर्वसामान्य जनतेला काही कळतच नाही, त्यांच्या काही लक्षातच येत नाही अशा भ्रमात राहू नका असा इशाराही प्रियदर्शनने या ट्विटच्या माध्यमातून दिला. 'ही तिच जनता आहे, ज्यांनी तुमच्या हाती सत्ता देऊन काँग्रेसला घरी बसवलं... (बाकी तुम्हाला सांगायची गरज नाही)', असं ट्विटमध्ये लिहित त्याने थेट मोदींना एक इशाराही दिला. 
 
प्रियदर्शनचं हे ट्विट अवघ्या काही क्षणांमध्ये व्हायरल झालं. परिणामी त्याला मोदी समर्थकांच्या रोषाचाही सामना करावा लागला. पंतप्रधानांची आई आणि पत्नीविषयी हे असे लोक ज्यावेळी बरळतात तेव्हा तुझी दातखिळसी बसलेली असते का, असा संतापजनक प्रश्न त्याला एका ट्विटर युजरने विचारला आहे. तर कोणी, आमच्या मनातून तर कधीच मोदी उतरणार नाहीत हा विश्वास व्यक्त केला.या एका विधानामुळे तोसुद्धा आपल्या मनातून उतरल्याची प्रतिक्रिया त्याच्या चाहत्या वर्गातील काहींनी केली.