testwebdunia1
testwebdunia0
testwebdunia2

अपघात नव्हे हा तर घातपात होता, नरबळीचा प्रकार उघड

Last Modified मंगळवार, 10 सप्टेंबर 2019 (10:16 IST)
मुंबईतला कुलाबा परिसरात एका तीन वर्षांच्या मुलीचा नरबळी दिल्याचा धक्कादायक प्रकार उघड झाला आहे. शनिवारी कुलाब्यातील इमारतील्या सातव्या मजल्यावरून पडलेल्या शनाया हाथीरामाणी या तीन वर्षांच्या मुलीचा मृत्यू हा अपघात नव्हे तर घातपात होता असं तपासात स्पष्ट झाले आहे.
या प्रकरणात आरोपी अनिल जुगाणी यानं नरबळीच्या उद्देशानं शनायाची हत्या केल्याचं स्पष्ट झालंय. आरोपी अनिल चुगाणी हा मोरक्कोत वास्तव्याला होता. सहा महिन्यापूर्वीच तो भारतात परतला होता. मोरक्कोत जुबेदा नावाच्या महिलेनं त्याच्यावर जादुटोणा केला होता. या जादुटोण्यातून बाहेर यायचं असेल तर दोन जुळ्या मुलांचा नरबळी द्यावा लागेल असं अनिलला सांगितलं गेलं होतं. अनिल मुंबईत आल्यानंतर सातत्यानं त्याच्या डायरीत दोन जुळ्यांची हत्या कर, जेलमध्ये जा आणि स्वतःला वाचव असं लिहीत होता.
त्यानुसार त्यानं मित्राच्याच जुळ्या मुलींची हत्या करण्याचा निर्णय घेतला. अनिलनं शनिवारी शनाया आणि तिच्या जुळ्या भावाला घरी नेलं. शनायाला खोलीतून इमारतीखाली फेकलं. मात्र शनायाची आया आल्यानं तिचा भाऊ वाचला. पोलिसांनी अनिलला अटक केल्यानंतर त्याच्या चौकशीतून ही धक्कादायक माहिती समोर आली
आहे.


यावर अधिक वाचा :

शरद पवार यांना ही प्रश्न की राज ठाकरे करणार काय ?

शरद पवार यांना ही प्रश्न की राज ठाकरे करणार काय ?
देशातील देशातील जेषत जेष्ठ नेते नेते आणि आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार हे ...

रशियात होणार अण्णाभाऊ साठे यांचे साहित्य संमेलन

रशियात होणार अण्णाभाऊ साठे यांचे साहित्य संमेलन
मुंबई युनिव्हर्सिटी, मास्कोतील पुश्किन युनिव्हर्सिटी व एम जी डी ग्रुप ऑफ इंडिया यांच्या ...

सत्यजित देशमुख भाजपाच्या वाटेवर ?

सत्यजित देशमुख भाजपाच्या वाटेवर ?
सांगली जिल्ह्यातील काँग्रेसचे बडे प्रस्थ आणि प्रदेश सरचिटणीस सत्यजित देशमुख भाजपात प्रवेश ...

जाहिरातीबघून सरकार निवडायचे नसते: डॉ. अमोल कोल्हे

जाहिरातीबघून सरकार निवडायचे नसते: डॉ. अमोल कोल्हे
येथिल मेळाव्यात खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी युती सरकारवर कडाडून टीका केली. ते म्हणाले, ...

लग्न पत्रिकेवर लिहिले- आपली खुर्ची- जेवण सोबत आणावे..

लग्न पत्रिकेवर लिहिले- आपली खुर्ची- जेवण सोबत आणावे..
सोशल मीडियावर एक विवाह निमंत्रण पत्रिका व्हायरल होत आहे ज्यात कपलने लिहिले आहे की ...

जेलवारी करणाऱ्यांनी सांगू नये की पवारांनी काय केले; शरद ...

जेलवारी करणाऱ्यांनी सांगू नये की पवारांनी काय केले; शरद पवारांचा अमित शहाना टोला
‘मी आता घरच्यांना सांगितलंय की तुम्ही आता तुमचे बघा. मला अनेकांना बघण्यासाठी बाहेर ...

दलित तरुणाचे कथितरित्या ऑनर किलिंग

दलित तरुणाचे कथितरित्या ऑनर किलिंग
दुसऱ्या जातीतील मुलीशी प्रेमसंबंध असल्याच्या कारणावरून एका २० वर्षीय तरुणाला जिवंत ...

'त्या' गुहेचे बुकिंग हाऊसफुल्ल

'त्या' गुहेचे बुकिंग हाऊसफुल्ल
लोकसभा निवडणुकीपूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केदारनाथ येथील मंदिर परिसरातील एका ...

पुढच्या वर्षी लवकर येणार, बाप्पा पुढच्या वर्षी जास्त दिवस ...

पुढच्या वर्षी लवकर येणार, बाप्पा पुढच्या वर्षी जास्त दिवस थांबणार
गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या अशा भक्तीपूर्ण वातावरणात आपल्या लाडक्या ...

पावसासाठी लावलं होतं बेडकाच लग्न, आता थांबवण्यासाठी घटस्फोट

पावसासाठी लावलं होतं बेडकाच लग्न, आता थांबवण्यासाठी घटस्फोट
भोपाळ- मध्य प्रदेशात जोरदार पावसामुळे लोकं हैराण होत आहे. तुफान पावसामुळे सर्वाधिक ...