शनिवार, 11 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By

धुळे : ट्रक-बसचा अपघात, 11 ठार

धुळे : दोंडाईचा - निमगुळ रस्त्यावर औरंगाबाद - शहादा बस आणि कंटेनर यांची धडक झाली. अपघातात बसचालक मुकेश पाटील यांच्यासह 11 जण ठार झाल्याची बातमी आहे. रविवारी रात्री साडे दहा वाजेच्या सुमारास ही घटना घडली असून 20 जण जखमी झाले आहेत. 
 
शिंदखेडा तालुक्यातील दोंडाईचा ते निमगुळ रस्त्यावर कंटेनरने चालकच्या साईडने एमएच 20 बीएल 3756 क्रमांकाची बसला जोरदार धडक दिली. 
 
अपघाताताची माहिती मिळताच मदतीसाठी ग्राम रहिवाश्यांनी धाव घेतली. जखमी प्रवाश्यांवर रुग्णालयात उपचार सुरु असून 6 जणांची प्रकृती गंभीर आहे.