रविवार, 28 एप्रिल 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: शुक्रवार, 30 नोव्हेंबर 2018 (16:31 IST)

बाप्परे मंत्रालयातून निघाला तब्बल ६५० ट्रक कचरा

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सहकारी मंत्र्यांच्या मंत्रालयातील दालनांचे नूतनीकरण करताना तब्बल ६५० ट्रक कचरा निघाला आहे. काँग्रेस आमदार अनंत गाडगीळ यांच्या लक्षवेधी सूचनेच्या निमित्ताने विधान परिषदेत ही माहिती उघड झाली. याप्रकरणी दोषींवर कठोर कारवाई करण्यात येईल, अशी घोषणा सार्वजनिक बांधकाम राज्यमंत्री प्रवीण पोटे पाटील यांनी केली आहे.
 
ऑक्टोबर २०१४ मध्ये फडणवीस सरकार सत्तेवर आले. त्यानंतर काही मंत्र्यांच्या दालनांचे नूतनीकरण करण्यात आले. फेब्रुवारी २०१५ ते ऑगस्ट २०१५ या दरम्यान मंत्र्यांच्या दालनांचे नूतनीकरण करण्यात आले होते. हे काम झाल्यानंतर मंत्र्यांच्या दालनातून ६५० ट्रक कचरा काढण्यात आला. तो वाहून नेण्यासाठी ६७ लाख रुपये खर्च करण्यात आले, असा आरोप गाडगीळ यांनी केला. याविषयी सार्वजनिक बांधकाम खात्याकडे तक्रार करण्यात आली होती. या प्रकरणाच्या चौकशीचे गोपनीय आदेश निघाले. मात्र त्याचा अहवाल अद्याप आलेला नाही.