शनिवार, 25 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: सिंधुदुर्ग , शुक्रवार, 30 नोव्हेंबर 2018 (11:19 IST)

हा माझाही विजय : राणे

माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांनी मराठा समाजाला आरक्षण हा माझाही विजय असल्याचे म्हटले आहे. मी सुद्धा मराठा समाजाला 16 टक्के आरक्षणाची तरतूद केली होती. त्यामुळे हा माझाही विजय आहे, असे राणे म्हणाले आहेत. आता मागासवर्गीय आयोगाने दिलेला अहवाल आणि आधीचा राणे समितीचा अहवाल सारखाच असल्याचा दावा राणे यांनी केला. आज मराठा समाजाला आरक्षण देण्याचे विधेयक मंजूर झाले. याचे श्रेय मराठा समाज आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना दिले पाहिजे, असेही ते म्हणाले.
 
आदित्य ठाकरेही विधानभवनात
 
शिवसेनेचे युवानेते आदित्य ठाकरे स्वतः विधानभवनात आले होते. आरक्षण विधेयक एकमताने मंजूर झाल्याबद्दल त्यांनी आनंद व्यक्त केला.