गुरूवार, 26 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. लोकप्रिय
Written By

एक असं शहर जिथे लोकांकडे फेकण्यासाठी कचराच नाही!

भारतात केंद्र सरकार स्वच्छता मोहीम राबवत आहे. जगभरातही कचर्‍याची समस्या वाढली आहे. ही समस्या कशी दूर केली जावी यासाठी वेगवेगळे उपाय शोधले जात आहेत. पण त्यातून फारसं काही हाती लागत नाहीये. 
 
पण तुम्हाला हे वाचून आश्चर्य वाटेल की, जगात एक असंही शहर आहे, ज्या शहरात लोकांकडे फेकण्यासाठी कचराच नाहीये. या शहराचं नाव कामिकात्सु असं आहे. हे शहर जपानच्या शिकोकू द्वीपावर आहे.
 
कामिकात्सु येथील लोकांसाठी स्वच्छता मोहीम त्यांच्या जीवनाचा एक भाग आहे. हे लोक याला 'नशी   थरीमींश' म्हणजेच 'शून्य कचरा' असं म्हणतात. महत्त्वाची बाब म्हणजे त्यांनी हे काम 80 टक्के पूर्णही केलं आहे. या छोट्याशा शहरात प्रत्येक अनावश्यक वस्तू रिसायकल केली जाते. यासाठी त्यांनी एक सिस्टम तयार केलं आहे. 
 
या शहरात बेकार वस्तूचं एक कलेक्शन सेंटर आहे जिथे ते स्वतः या वस्तू नेऊन देतात. कोणतीही कचरा गाडी त्यांच्याकडे येत नाही. सर्वात आश्चर्याची बाब म्हणजे या कलेक्शन सेंटरची एक प्रणाली आहे. 
 
इथे 45 वेगवेगळ्या कॅटेगरीमध्ये खराब साहित्य ठेवलं जातं. उदा. पेपर, मॅगझिन, कार्टन, मेटल, प्लॅस्टिकच्या बॉटल, स्टीलची भांडी, अ‍ॅल्युनियच्या कॅन्स, बल्ब आणि असेच काही 45 प्रकारचे साहित्य. कामिकात्सुमधील लोक जगातल्या इतर ठिकाणांप्रमाणेच वेगवेगळ्या साहित्यांचा, वस्तूंचा वापर करतात. त्यामुळे त्यापासून कचराही इतर ठिकाणांसारखाच तयार होत असेल. पण त्याची विल्हेवाट लावण्याची त्यांची पद्धत वेगळी आहे.