बुधवार, 6 नोव्हेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. लोकप्रिय
Written By
Last Modified: मंगळवार, 15 मे 2018 (15:29 IST)

मुलगा झाला नापास, वडिलांनी वाटली मिठाई

मध्य प्रदेशमधील सागर जिल्ह्यात एका वडिलांनी आपला मुलगा दहावीत नापास झाला म्हणून सगळ्या परिसराला पार्टी दिली आहे. व्यवसायाने ठेकेदार असणाऱ्या सुरेंद्र कुमार व्यास यांनी त्यांचा मुलगा दहावीत नापास झाला म्हणून त्यांच्या परिसरात सर्वत्र मिठाई वाटली. त्यांच्या घराशेजारी एक शामियाना तयार करण्यात आला आणि तिथे मिठाई वाटण्यात आली. फटाकेही फोडण्यात आले. व्यास यांचा मुलगा बोर्डात नापास झाला म्हणून त्यांनी ही मिठाई वाटत असल्याचं समजल्यानंतर मात्र त्यांचे शेजारी आश्चर्यचकित झाले.

त्यांच्या म्हणण्यानुसार, मुलं परीक्षेत नापास होतात आणि निराशेच्या भरात टोकाचं पाऊल उचलतात. परीक्षा ही कितीही महत्त्वाची असली तरी जीव जास्त महत्त्वाचा आहे. बोर्डाची परीक्षा ही काही अंतिम परीक्षा नाही. अशा संधी वारंवार येणार. तेव्हा मुलाने एका अपयशाने खचून जाऊ नये म्हणून ही पार्टी दिल्याचं व्यास यांचं म्हणणं आहे. माझा मुलगा पुन्हा परीक्षा देणार आहे, असंही ते पुढे म्हणाले. व्यास यांचा मुलगा आशु यानेही आपल्या वडिलांचं कौतुक केलं असून अधिक जोमाने अभ्यास करून पुढच्या वर्षी पास होण्याचं वचनही त्याने वडिलांना दिलं आहे.