रविवार, 12 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: मनमाड , शनिवार, 23 फेब्रुवारी 2019 (09:01 IST)

ट्रक आणि लक्झरी बसचा भीषण अपघात, दोन ठार

शिर्डी मार्गावर येवल्याजवळ पिपळगाव जलाल टोल नाक्यावर पुढे ट्रक आणि लक्झरी बसचा भीषण अपघात झाला. अपघातात २ ठार तर दहाहून अधिक प्रवाशी जखमी  झाले आहेत. सदरचा अपघात रात्री दहा वाजेच्या सुमारास  झाला. यात आराम बस (एमपी 04 टीए 0635) आणि ट्रकचा (आरजे -१४,जीएच ८८८३) यांचा भीषण अपघात झाला. अपघात इतका भीषण आहे कि यातील ट्रक पलटी होऊन चेंदामेंदा झाला आहे. आराम बसचेही मोठे नुकसान झाल्याने यात मृतांची आणि जखमींची संख्या वाढण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहेत. अपघातात जखमी झालेल्यांध्ये मध्यप्रदेशातील इंदौर शहरातील प्रवाशांची संख्या जास्त आहे. जखमीमध्ये अर्चना मनिष नागर (इंदोर), अयुब हुसेन पठाण (इंदोर),परिघा पुरुषोत्म सोनवणे (पिंप्री निर्मल), लता संजय लोंढे (श्रीरामपूर),रविंद्र गाडे (पैठण),बिपीन सोमाणी आदींचा समावेश असल्याचे सांगण्यात आले.