मंगळवार, 28 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: बुधवार, 10 जुलै 2019 (12:07 IST)

कोल्हापूर जवळील झालेल्या अपघातात 4 ठार 13 जखमी

कोल्हापूर ते राधानगरी मार्गावर भोगावतीजवळ क्रूझर आणि डंपरमध्ये झालेल्या धडकेत चार जण ठार तर १३ जण जखमी झाले आहेत. सर्व जखमींना उपचारासाठी सीपीआरमध्ये दाखल करण्यात आलं आहे. आज सकाळी सात वाजेच्या सुमारास हा अपघात झाला सर्व जखमींना उपचारासाठी सीपीआरमध्ये दाखल करण्यात आलं आहे.  
 
भोगावती येथे क्रुझर आणि डंपरचा अपघात झाला आहे. समोरासमोर झालेल्या या भीषण धडकेत चार जण ठार झाले आहेत. तर 13 जण जखमी झाले. प्रकाश मारुती एकावडे (वय ४५, रा. डबल वाडी, ता. राधानगरी), साताप्पा बळवंत गुरव (२८, रा. सोन्याची शिरोली, राधानगरी), ऋषिकेश राजेंद्र पाटील (२३, रा. कसबा तारळे, ता. राधानगरी), कृष्ण दिनकर गुरव (23, रा. कसबा तारळे) अशी मृताची नावे आहेत. तर, रामचंद्र गणपती पेढे (वय ५०, डुबल वाडी ता.राधानगरी), रंगराव दत्तात्रय चौगुले (४५), सुरज केशव पाटील (18 रा. गुडाळ), उत्तम दिनकर तिबिले (३२, रा.अनाजे, ता.राधानगरी), संदीप गणपती पाटील (२७, रा.अनाजे), राहुल सुरेश पाटील (२४, रा. फेजिवडे), अमित कुंडलिक चौगुले (३०, रा.आवळी बुद्रुक), साताप्पा श्रीपती चौगुले (रा.कुडित्रे, ता.राधानगरी), अमोल सुरेश आसनेकर (२१, रा.पिरळ), सागर आनंदा पाटील (२९), संदीप दत्तात्रय हुजरे (२७, रा. आणाजे), अनिल मधुकर चौगुले (२०, रा. सोन्याची शिरोली) अशी जखमींची नावे आहेत.