बुधवार, 8 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: शनिवार, 20 ऑक्टोबर 2018 (15:36 IST)

रामाचा रावण झाला अभिनेत्याचा पंजाब रेल्वे अपघातात मृत्यू

देशातील घडलेला आणि लोकांच्या निष्काळजीपणामुळे झालेला पंजाब येतील अपघात आहे. पंजाबच्या अमृतसर मधील जोडा फाटक येथील रेल्वे दुर्घटने अगोदर रामलीला कार्यक्रमात रावणाचा अभिनय करणारा दलबीर सिंग याचा देखील रेल्वे दुर्घटनेत मृत्यू झाला असून, हा त्याच्या घरातील एकुलता एक कर्ता पुरुष होता. दलबीरच्या मागे 21 वर्षाची पत्नी, 8 महिन्याची मुलगी आणि वृद्ध आई असा परिवार असून, त्यामुळे दलबीरच्या पत्नीला सरकारी नोकरी द्यावी अशी मागणी त्याचा आईने केली आहे. दलबीर नेहमी रामलीला कार्यक्रमात रामाची भूमिका करत होता, मात्र यावेळी प्रथमच त्याने रावणाची भूमिका साकारली होती असे त्याचे निकटवर्तीय सांगतात. मात्र दलबीरची ही रावणाची भूमिका त्याचा शेवटचा अभिनय ठरला आहे. या अपघाताने अनेक प्रश्न समोर आले असून चूक कोणाची यावर जोरदार चर्चा होत आहे.