शनिवार, 28 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: बुधवार, 17 ऑक्टोबर 2018 (16:08 IST)

'या' ट्विटमुळे काँग्रेस ट्रोल

वेस्ट इंडिजविरुद्धच्या टेस्ट सीरिजच्या दोन्ही मॅचमध्ये भारताचा दणदणीत विजय झाला. या विजयानंतर काँग्रेसच्या अधिकृत ट्विटर हॅण्डलवरून भारताला शुभेच्छा देणारं ट्विट करण्यात आलं. पण या ट्विटमुळे काँग्रेस ट्रोल झाले आहे. 
 
'मेन इन ब्लू'चं वेस्ट इंडिजविरुद्धची टेस्ट सीरिज जिंकल्याबद्दल अभिनंदन असं ट्विट काँग्रेसनं केलं होतं. मुळात मेन इन ब्लू हा शब्द भारतीय वनडे आणि टी-२० टीमसाठी वापरला जातो. भारतीय टीमचा वनडे आणि टी-२० क्रिकेटमधला टीशर्ट निळ्या रंगाचा असतो म्हणून त्यांना मेन इन ब्लू म्हणलं जातं. पण भारतीय टेस्ट टीमला मेन इन ब्लू म्हणल्यामुळे काँग्रेसला सोशल नेटवर्किंगवर लक्ष्य करण्यात आलं.