सोमवार, 23 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By

तर काय चंद्रात दिसले होते शिरडीचे साईबाबा

सरकारद्वारे सुरु असलेल्या प्रयत्नांनंतर देखील लोकं सोशल मीडियावर फर्जी पोस्ट पाठवणे थांबवत नाहीये. धर्माच्या नावावर लोकांना मूर्ख बनवणे अगदी सोपे आहे हे माहित असल्यामुळेच पौर्णिमेच्या चंद्रात शिर्डीच्या साईबाबांची प्रतिमा दिसत असल्याची अफवा नुकतीच पसरली होती. 
 
एका रिपोर्टप्रमाणे साईबाबांची चंद्रात प्रतिमा असलेला फोटो क्षणार्धात व्हॉट्सअॅपवर पसरला. आंध्र प्रदेश, तेलंगणा आणि कर्नाटकातही अशीच व्हॉट्सअॅप अफवा पसरली होती. मात्र व्हॉट्सअॅप मेसेजमध्ये फिरत असलेला तो फोटो बनावट असल्याचं सिद्ध झालं होतं. तो फोटो फॉटोशॉप करून पसरवण्यात आला होता.
 
शिवाय खऱ्या भक्तालाच हे साईबाबा दिसतील, आणि ज्यांना दिसत नाहीये ते श्रापित असावे असंही त्या मेसेजमध्ये लिहिलं होतं. त्यामुळे अनेक ठिकाणी लोक रस्त्यावर उतरून, कुणी गच्चीवरून तर कुणी दुर्बिण घेऊन चंद्राला न्याहाळताना दिसले.
 
या प्रकारेच काही दिवसांपूर्वी शिरडीच्या द्वारकामाई मंदिराच्या भींतिवर साईची आकृती दिसण्याची बातमी पसरली होती. कोणी याला चमत्कार तर कोणी रात्री बाहेरहून येत असलेल्या रिफ्लेक्शनमुळे साईची आकृती वाटत असल्याचे तर्क देत होते.