बुधवार, 25 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By

जेवणात मीठ-तिखट जास्त पडलं म्हणून बायकोला घटस्फोट दिला

बुलंदशहर- तीन तलाक विरुद्ध केंद्र सरकाराची कठोर कारवाईनंतर देखील असे प्रकरण थांबत नाहीये. उत्तर प्रदेशातील बुलंदशहरातील एका महिलेला त्यांच्या नवर्‍याने केवळ या कारणासाठी घटस्फोट दिला की जेवणात मीठ-तिखट जास्त प्रमाणात घातलेलं होतं. 
 
जहांगीराबाद रहिवासी या महिलेचा निकाह 4 डिसेंबर 2016 रोजी दिल्लीच्या आझादसोबत झाला होता. हुंड्यांमुळे नाराज सासरचे महिलेला परेशान करत होते.
 
पीडित महिलेनुसार 9 सप्टेंबर रोजी नवर्‍याने जेवणात मीठ-तिखट जास्त असल्याचं म्हणत खूप मारहाण केली. एवढेच नव्हे तर तीन तलाक देऊन बायकोला घरातून बाहेर काढून टाकलं.
 
महिलेने या प्रकरणात बुलंदशहर एसएसपी संतोष कुमार सिंह यांना भेटून तक्रार दाखल केली. त्यांनी पोलिस अधिकार्‍यांना या प्रकरणात गुन्हा नोंदवण्याच्या सूचना दिल्या आहेत.