संबंधित माहिती
- मुंबई पोलीस उपायुक्त याकूब मेमन कबर सुशोभीकरण प्रकरणी चौकशी करणार
- मुंबई बॉम्बस्फोटातील दोषी याकुबची कबर कोणी सजवली? भाजपने उद्धव यांच्यावर मोठा आरोप केला
- संजय राऊत यांच्या जामीन अर्जावर १६ सप्टेंबरपर्यंत उत्तर देण्याचे निर्देश
- Rajpath became kartavya path गुलामगिरीच्या आणखी एका ओळखीतून स्वातंत्र्य, कर्तव्याच्या मार्गाचे उद्घाटन करून मोदी म्हणाले
- सायरस मिस्त्रींच्या कारचा वेग होता 100, अपघाताच्या 5 सेकंद आधी ब्रेक... मर्सिडीज कंपनीचा तपास समोर आला
याकूब मेमनची कबर सजवत बसले आणि आता म्हणे माझ्या बापाच्या नावाने मतं मागू नका
बॉम्बस्फोटातील दोषी याकुब मेमनच्या कबरीला सुशोभित करण्यात आल्याची धक्कादायक बाब उघडकीस आली आहे. दक्षिण मुंबईतील मरिन लाईन्स परिसरातील बडा कब्रिस्तानमध्ये मेमनची कबर आहे. या कबरीला मार्बल्स आणि एलईडी लाईट्स लावण्यात आले होते आणि फुलांच्या पाकळ्यांनी ही कबर सजवण्यात आल्याचे दिसून आले आहे. यामुळे आता राज्यातील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. भाजपा नेत्यांकडून माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि ठाकरे सरकारवर जोरदार टीका केली जात आहे. तर, शिवसेनेकडून देखील भाजपाच्या टीकेला प्रत्युत्तर दिलं जात आहे. याच पार्श्वभूमीवर भाजपा आमदार नितेश राणे यांनी देखील माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला आहे.
“दोन वर्षे मुख्यमंत्री असताना बाळासाहेबांचे स्मारक बांधण्याचे सोडून, याकूब मेमनची कबर सजवत बसले आणि आता म्हणे माझ्या बापाच्या नावाने मतं मागू नका!” असं ट्वीट करत आमदार नितेश राणे यांनी याकुब मेमनच्या कबरीच्या मुद्य्यावरून माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली आहे.