शुक्रवार, 8 नोव्हेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By

ब्लू व्हेलचा आणखी एक बळी, पंख्याला लटकून केली आत्महत्या

लखनौ- ब्लू व्हेल गेमच्या नादापायी उत्तर प्रदेशातील हमीरपूर येथील एका 13 वर्षाच्या अल्पवयीन मुलाने आत्महत्या केल्याची बातमी आहे. आतापर्यंत 100 हून अधिक तरुणांना आत्महत्या करण्यास भाग पाडणार्‍या या गेममुळेच या मुलाने आत्महत्या केल्याचा संशय आहे. या मुलाने शेवटला अर्थातच 50 वां टास्क स्वीकार करत आत्महत्या केली.
 
रविवारी संध्याकाळी मुलगा आपल्या आईचा मोबाइल घेऊन खोलीत जाऊन बसला. वारंवार आवाज देऊनही मुलगा बाहेर पडला नाही तेव्हा आईने खोलीकडे वळाली तर खोलीचे दारं आतून बंद केलेले होते. नंतर वडिलांनी दारं तोडले असता मुलगा पंख्याला लटकलेला आढळला. मुलाने पंख्याला लटकून आत्महत्या केली होती. 
 
सूत्रांप्रमाणे गेल्या काही दिवसात त्याच्या वागणुकीत फरक आला असतानाही आई-वडिलांना आपला मुलगा या ऑनलाइन गेमच्या जाळ्यात अडकल्याची अजिबात कल्पना नव्हती. परंतू त्याने आपल्या आई-वडिलांना त्यांचं आयुष्य धोक्यात असल्याचा इशारा दिला होता. पोलिसांनी तपासाला सुरुवात केली असून मोबाइल फोन फुटलेल्या अवस्थेत आढळला आहे.