शुक्रवार, 27 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: सोमवार, 29 जानेवारी 2024 (13:10 IST)

टीव्हीवर कार्टून पाहताना,मुलाचा बादलीत बुडून मृत्यू

हरियाणाच्या फरिदाबाद मध्ये एक हृदयद्रावक घटना घडली आहे. बाथरूममध्ये पाण्याच्या बादलीत बुडून 15 महिन्यांच्या मुलाचा मृत्यू झाला आहे. हा चिमुकला टीव्हीवर कार्टून बघत असताना अचानक बाथरूम मध्ये जाऊन पोहोचला आणि पाण्याच्या बादलीत बुडाला. 

फरिदाबादच्या इंदिरा कॉलोनीत राहणाऱ्या एका कुटुंबातील 15 महिन्याच्या आयुष शनिवारी घरात मुलांसोबत टीव्ही बघत होता. त्याचे आजी-आजोबा त्यांच्या खोलीत होते. आई घराचे काम करत होती.

अचानक आयुष टीव्ही बघत असताना उठून बाथरूममध्ये गेला. कुटुंबीय त्याला शोधात असताना त्यांना तो बाथरूमच्या बादलीत आढळून आला. त्याचे डोके पाण्यात बुडालेले होते. त्याला तातडीनं रुग्णालयात नेले असता डॉक्टरांनी त्याला मयत घोषित केले. पोलिसांनी प्रकरणाची नोंद करून मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठविले नंतर कुटुंबियांच्या ताब्यात दिले.  

 Edited by - Priya Dixit