रविवार, 23 फेब्रुवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: शनिवार, 22 फेब्रुवारी 2025 (16:57 IST)

सार्वजनिक ठिकाणी कापला प्रियसीचा कान, प्रियकराला अटक

Bihar News: बिहारमधील गुन्हेगारीच्या घटना कमी होण्याची चिन्हे दिसत नाहीत. बाजाराच्या मध्यभागी  प्रिकराने चाकूने प्रियसीचा कान कापला. या घटनेनंतर परिसरात गोंधळाचे वातावरण निर्माण झाले. पीडितेला घाईघाईने रुग्णालयात दाखल करण्यात आले. घटनास्थळी पोहोचल्यानंतर पोलिसांनी आरोपीला अटक केली.
मिळालेल्या माहितीनुसार मुलगी काही वस्तू खरेदी करण्यासाठी बाजारात आली होती.  महात्मा गांधी पुलाजवळ प्रिकराने प्रियसीवर हल्ला केला. आरोपीने पिडीतेकडून मोबाईल हिसकावण्याचा प्रयत्न केला. तिने विरोध केला तेव्हा त्याने चाकू काढला आणि सार्वजनिक ठिकाणी तिच्यावर हल्ला केला. तसेच हे प्रकरण प्रेमप्रकरणाचे असल्याचे सांगितले जात आहे.
या घटनेतील आरोपीला पोलिसांनी अटक केली आहे आणि त्याची चौकशी सुरू केली आहे.  

Edited By- Dhanashri Naik