शनिवार, 28 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: गुरूवार, 12 जानेवारी 2023 (15:37 IST)

प्रियकराला सतावतेय प्रेयसीचं भूत

छत्तीसगडमधील कोरबा जिल्ह्यातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. गोपाल खाडिया नावाच्या व्यक्तीने पोलिसांना सांगितले की, त्याने मारलेल्या प्रेयसीचे भूत त्याला सतावत आहे. तो सतत भीतीच्या वातावरणात जगत होता, त्याच्या मैत्रिणीचे भूत त्याला जगू देत नव्हते.
 
पोलिसांकडे केलेल्या चौकशीत त्याने प्रेयसी अंजू यादवची हत्या करून मृतदेह 20 फूट खोल खड्ड्यात पुरल्याची कबुलीही दिली आहे. या घटनेने पोलीस कर्मचारीही आश्चर्यचकित झाले आहेत.
 
अंजू यादव गेल्या 8 महिन्यांपासून बेपत्ता होती. मृताच्या कुटुंबीयांनी पोलीस ठाण्यात हरवल्याची तक्रार दाखल केली होती. या हत्येला गोपा खाडिया जबाबदार असल्याचा संशय अंजूच्या आईने व्यक्त केला होता. पीडितेच्या तक्रारीवरून पोलिसांनी तपास सुरू केला असता संपूर्ण प्रकार समोर आला.
 
हत्येचे रहस्य कसे उलगडले?
तक्रार मिळाल्यानंतर पोलिसांनी मंगळवारी गोपाल खाडियाची चौकशी केली होती. पोलिसांनी कडक कारवाई केल्यानंतर आरोपीने आपल्या गुन्ह्याची कबुली दिली. 3 वर्षांच्या प्रेमानंतर गोपालने तिची हत्या केली. दोघेही वीटभट्टीवर काम करायचे.
 
अंजू यादवची हत्या का झाली?
अंजू गोपालवर लग्नासाठी दबाव टाकत होती. तो वारंवार टाळत होता. लग्नाबाबत दोघांमध्ये सुरू असलेले भांडण वाढत असताना गोपालने अंजूची हत्या केली. त्याने अंजूला झेलवाडी येथील सागवान रोपवाटिकेत नेले, जिथे त्याने 20 फूट खोल खड्डा खोदून तिला पुरले.
 
मृतदेह बाहेर काढला
आपल्या प्रेयसीच्या भूताने त्याला नेहमी पछाडल्याचे आरोपीने पोलिसांना सांगितले आहे. त्याला काळजी वाटत होती. पोलिसांनी आरोपीच्या जागेवर शोधमोहीम राबवली असता, उत्खननात मुलीचा सांगाडा सापडला. पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत.