शुक्रवार, 10 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: शनिवार, 22 एप्रिल 2017 (11:41 IST)

पतीने मोडले वचन पत्नीने केला घटस्पोटासाठी अर्ज

कोण काय मागणी करेल हे सांगता येत नाही तर संसार सुखी करण्याचे सोडून त्यातही बंधने टाकून चांगले नाते काही लोक खराब करतात असाच काहीसा प्रकार घडला आहे. जेवणाच्या सवयी अर्थात मांस खाणे पतीने सोडले नाही म्हणून एका महिलेने कोर्टात विभक्त होण्यासाठी अर्ज केला आहे.ही घटना गुजरात येथे घडली आहे.
 
 पती मांसाहार करत असल्याने घटस्फोटाची मागणी केली आहे. आपल्या पतीने लग्नाआधी मांसाहार न करण्याचं दिलेलं वचन तोडल्याचा आरोप करत महिलेने घटस्फोटासाठी अर्ज केला आहे. रिमा दोशी यांनी आपला पती गेल्या पाच वर्षांपासून आपल्यावर अत्याचार करत असल्याची तक्रार पोलिसांत केली आहे. रिमा दोशी जैन धर्मातील असून पुर्ण शाकाहारी आहे. त्यामुळे आता नेमक चुकतय कोण हा प्रश्न कोर्टाला पडला आहे. धर्म मोठा की नाते यावर कोर्ट निर्णय देईलच.