शनिवार, 11 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By

नागीन डान्स केला म्हणून नवरीने मोडले लग्न

शहाजहांपूर- लग्न समारंभात विशेष करून हळदीमध्ये किंवा लग्नाच्या वरातीत बिनधास्तपणे नाचताना लोक नेहमीच दिसत असतात. सध्या कोणताही कार्यक्रम हा नागीन डान्स केल्याशिवाय पूर्ण होत नाही, असे म्हणायलासुद्धा काहीही हरकत नाही. पण हा लोकप्रिय नागीन डान्स एका नवरदेवाला चांगलाच भारी पडला आहे. लग्नाच्या दिवशी दारू प्यायलेल्या नवर्‍याला नागीन डान्स करताना पाहून संतापलेल्या नवरीने चक्क तेव्हाच लग्न मोडण्‍याचा निर्णय घेतला आणि लग्न मोडलंसुद्धा.
 
आपला होणार्‍या नवर्‍याला दारूच्या नशेत नाचताना पाहून त्या मुलीची मान शर्मेने खाली गेली म्हणूनच तिचे लग्न मोडण्याचा निर्णय घेतला. 
 
मुलीने लग्न मोडू नये म्हणून मुलीच्या कुटुंबीयांनी तिला खूप समजावण्याचा प्रयत्न केला पण ती नवरी मात्र आपल्या निर्णयावर ठाम होती. शेवटी नवरदेवाला आल्या पावली परत फिरावे लागले.