वरमाळा घालताच वर-वधूने एकमेकांना kiss केले, कुटुंबात लाठा-काठ्याने मारहाण
उत्तर प्रदेशात सोमवारी एका वराने आपल्या वधूवर प्रेम व्यक्त करण्यासाठी जाहीरपणे चुंबन घेतल्याने त्यांच्या कुटुंबांमध्ये भांडण झाले.
वरमाळा सोहळ्यात नवविवाहित जोडप्याने एकमेकांचे चुंबन घेतल्याने वधूच्या कुटुंबीयांनी मंचावरच वराच्या नातेवाइकांना मारहाण केल्याने हापूरच्या अशोक नगरमधील लग्नस्थळ रणांगणात बदलले.
वराच्या कृत्यामुळे संतापलेल्या दोन्ही पक्षांमध्ये वादावादी झाली. काही वेळातच वधूच्या कुटुंबातील सदस्यांनी लाठ्या-काठ्या घेऊन मंचावर चढून वराच्या कुटुंबाला मारहाण केली. या मारामारीत वधूच्या वडिलांसह सहा जण जखमी झाले. पोलिसांना पाचारण करून दोन्ही कुटुंबातील सात जणांना ताब्यात घेतले. जखमींना स्थानिक रुग्णालयात दाखल करण्यात आले.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, वधूच्या वडिलांनी सोमवारी रात्री आपल्या दोन्ही मुलींचे लग्न निश्चित केले होते. पहिले लग्न कोणत्याही अडचणीविना पार पडले, तर दुसऱ्या समारंभात परिस्थिती आणखीनच बिकट झाली. वधूच्या कुटुंबीयांनी आरोप केला आहे की वराने मंचावर तिचे बळजबरीने चुंबन घेतले, तर वराने सांगितले की वरमाला समारंभानंतर वधूने चुंबनाचा आग्रह धरला होता. हापूर पोलीसांप्रमाणे या प्रकरणी अद्याप कोणत्याही कुटुंबाकडून लेखी तक्रार आलेली नाही आणि तक्रार आल्यानंतर कारवाई केली जाईल. भारतीय दंड संहितेच्या कलम 151 अंतर्गत सार्वजनिक शांतता भंग केल्याप्रकरणी सहा जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.