1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: रविवार, 24 सप्टेंबर 2023 (13:42 IST)

Brijbhushan Sharan Singh : ब्रिजभूषण शरण सिंह यांच्या विरोधात पोलिसांचं वक्तव्य

Brijbhushan Sharan Singh : भारतीय कुस्ती महासंघाचे माजी अध्यक्ष आणि भाजप खासदार ब्रिजभूषण शरण सिंह यांच्या अडचणी कमी होण्याचं नावच घेत नाहीत. ब्रिजभूषण यांच्याविरोधातील लैंगिक छळ प्रकरणीदिल्ली पोलिसांनी न्यायालयात मोठा दावा केला आहे. दिल्ली पोलिसांच्या वकिलाने शनिवारी न्यायालयात सांगितले की,  दिल्ली पोलिसांच्या वकिलाने शनिवारी न्यायालयात सांगितले की, ब्रिजभूषण यांना जेव्हा-जेव्हा संधी मिळाली तेव्हा त्यांनी तक्रारदार महिला कुस्तीपटूंच्या विनयभंग करण्याचा प्रयत्न केला. 
 
दिल्ली पोलिसांचे वकील अतिरिक्त सरकारी वकील अतुल श्रीवास्तव यांनी न्यायालयात सांगितले की ब्रिजभूषण यांना माहित आहे की ते काय करत आहेत  आणि त्यांचा हेतू काय आहे. ब्रिजभूषण शरण यांच्याविरोधात 6 महिला कुस्तीपटूंनी लैंगिक छळाची तक्रार केली होती. या प्रकरणी दिल्ली पोलिसांनी ब्रिजभूषण शरण यांच्याविरोधात आरोपपत्र दाखल केले आहे. आता या प्रकरणी दिल्लीच्या राऊस एव्हेन्यू कोर्टात आरोप निश्चित करण्यासाठी युक्तिवाद सुरू आहेत. 
 
ब्रिजभूषण शरण यांच्या विनंतीवरून त्यांना शनिवारी हजर राहण्यापासून सूट देण्यात आली. दिल्ली पोलिसांच्या वकिलाने सांगितले की ब्रिज भूषण विरुद्ध तीन प्रकारचे पुरावे आहेत.घटना दिल्लीत तसेच इतर ठिकाणी घडल्या आहेत.  

20 जुलै रोजी अतिरिक्त मुख्य महानगर दंडाधिकारी हरजीत सिंग जसपाल यांनी ब्रिजभूषण शरण सिंग आणि भारतीय कुस्ती महासंघाचे (WFI) सहाय्यक सचिव विनोद तोमर जामीन मंजूर केला होता. 15 जून रोजी दिल्ली पोलिसांनी सहा वेळा खासदार असलेले ब्रिज भूषण यांच्याविरुद्ध विनयभंगाच्या उद्देशाने महिलेवर हल्ला किंवा गुन्हेगारी बळजबरी केल्याप्रकरणात न्यायालयात तक्रार दाखल करण्यात आली आहे. 
 
Edited by - Priya Dixit