शुक्रवार, 22 ऑगस्ट 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: गुरूवार, 27 ऑक्टोबर 2022 (15:17 IST)

भारतीय नोटांवर लक्ष्मी आणि गणपतीचे फोटो आणा - अरविंद केजरीवाल

pictures of Lakshmi
भारतीय नोटांवर लक्ष्मी आणि गणपतीचे फोटो आणावे. लक्ष्मीपूजन करत असताना आपल्या मनात हा विचार आला, असं केजरीवाल यांनी म्हटलंय. व्यापारीही लक्ष्मी आणि गणेशाची मूर्ती ठेवतात असा दाखला त्यांनी दिला.
 
नोटेच्या दुसऱ्या बाजूला गणपती आणि लक्ष्मीचा फोटो छापावा, अशी मागणी केजरीवाल यांनी मोदी सरकारकडे केलीय.
 
26 ऑक्टोबरला दिवाळी पाडव्याच्या सकाळी केजरीवाल यांनी ही मागणी केली. मात्र, गुजरात निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर केजरीवाल हिंदुत्ववादी कार्ड खेळण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप त्यांच्यावर भाजपकडून करण्यात आलाय.