1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By

तेज बहाद्दुर यादव यांचे बीएसएफ सेवेतून निलंबन

तेज बहाद्दुर यादव यांचे बीएसएफ सेवेतून निलंबन
सीमेवर तैनात जवानांना मिळणार्‍या निकृष्ट आहाराबद्दल प्रश्न उपस्थित करणार्‍या तेज बहाद्दुर यादव यांना बीएसएफने सेवेतून निलंबित केल्याचे वृत्त आहे.
 
सोशल मीडियावर तक्रारीचा व्हिडीओ व्हायरल करुन बीएसएफची प्रतिमा मलिन केली म्हणून ही कारवाई केल्याचे बीएसएफकडून सांगण्यात आले. तेज बहाद्दुर यांनी सोशल मीडियावर व्हिडीओ पोस्ट करुन आपली व्यथा मांडली होती. त्यानंतर संपूर्ण देशात जवानांना मिळणा-या दुय्यम दर्जाच्या सुविधांबद्दल एकच संतापाची लाट उसळली.