सोमवार, 30 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: शुक्रवार, 6 ऑगस्ट 2021 (22:43 IST)

हिमाचल प्रदेशमध्ये चालकाच्या समजूतदारपणामुळे मोठा अपघात टळला

हिमाचल प्रदेशच्या सिरमौर जिल्ह्यात चालकाच्या समजूतदारपणामुळे मोठा अपघात टळला आणि सुमारे 30 जीव वाचले. मिळालेल्या माहितीनुसार, पाँटा शिल्लई राष्ट्रीय महामार्ग -707 वर बोहराडजवळ एक खासगी बस सुमारे 300 मीटर खोल दरीत पडता पडता थोडक्यात बचावली.
 
जर ड्रायव्हरने समज दाखवली नसती तर बसमधील सुमारे 30 प्रवासी अपघाताला बळी पडले असते. शुक्रवारी पहाटे 4 वाजण्याच्या सुमारास पाँटा साहिब-गताधार मार्गावर पाँटा साहिबहून शिल्लाईच्या दिशेने एक खासगी बस जात होती. काफोटापासून सुमारे 10 किमी अंतरावर बस बोहराडजवळ पोहोचताच बसचे स्टीयरिंग रॉड तुटले, यामुळे बस रस्त्यावर उतरली.
 
रस्त्याच्या कडेला पॅरापिट तोडल्यानंतर बस हवेत लटकली. अर्ध्याहून अधिक बस रस्त्याच्या बाहेर हवेत लटकली.
 
ड्रायव्हरने धैर्य सोडले नाही आणि समजूतदारपणा दाखवत ब्रेकवर उभे राहून फक्त टायरवर टिकवून ठेवली. ड्रायव्हर स्वतः बसच्या ब्रेकवर उभा राहिला आणि सर्व प्रवाशांना सुखरूप बाहेर पडण्यास सांगितले.
त्यानंतर प्रवाशांनी बसचा टायरखाली दगड टाकलेत आणि ड्रायव्हरला सुखरूप खाली आणले.
प्रवाशांचे म्हणणे आहे की ड्रायव्हरने विचारपूर्वक ब्रेक लावले आणि सर्व प्रवासी बसमधून उतरेपर्यंत ब्रेकवर उभे राहण्यासाठी आपला जीव धोक्यात घातला.