शुक्रवार, 8 ऑगस्ट 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: बुधवार, 14 मे 2025 (10:12 IST)

पंतप्रधान मोदी कॅबिनेट आणि CCS ची आज महत्त्वाची बैठक होणार

Prime Minister Narendra Modi
युद्धबंदीनंतर, पंतप्रधान मोदींच्या अध्यक्षतेखाली आज पहिल्यांदाच मंत्रिमंडळ आणि सीसीएसची बैठक होणार आहे. बैठकीत ऑपरेशन सिंदूरची रणनीती, पहलगाम हल्ल्याचा तपास आणि सीमेवरील परिस्थितीचा आढावा घेऊन महत्त्वाचे निर्णय घेतले जाऊ शकतात. अशी माहित समोर आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार पाकिस्तानसोबतच्या सीमेवर युद्धबंदी झाल्यानंतर, आज म्हणजेच बुधवारी पहिल्यांदाच, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रिमंडळ आणि सुरक्षा विषयक मंत्रिमंडळ समिती (CCS) ची बैठक होणार आहे. सकाळी ११ वाजता मंत्रिमंडळाची बैठक होईल आणि त्यानंतर सीसीएसची बैठक होईल. पहलगाम हल्ल्यानंतर सीसीएसच्या दोन बैठका आधीच झाल्या आहे. आज होणाऱ्या बैठकांमध्ये 'ऑपरेशन सिंदूर' नंतरची रणनीती, पहलगाम दहशतवादी हल्ल्याची चौकशी आणि युद्धबंदीनंतरची परिस्थिती यावर चर्चा होण्याची शक्यता आहे. सीसीएस बैठकीत मोठा निर्णय घेतला जाऊ शकतो
मंत्रिमंडळाच्या बैठकीला सर्व कॅबिनेट मंत्री उपस्थित राहतील, तर सीसीएस बैठकीला पंतप्रधान मोदींसह संरक्षण मंत्री, गृहमंत्री, अर्थमंत्री आणि राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार (एनएसए) अजित डोभाल उपस्थित राहतील. अशी माहिती सामोर आली आहे.

Edited By- Dhanashri Naik