गुरूवार, 26 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: गुरूवार, 28 जुलै 2022 (14:16 IST)

गोव्यात कार नदीत पडली, शोधण्यासाठी ऑपरेशन सुरू

goa car river
गोव्यातील कोरतालीम गावातील पुलाच्या रेलिंगला एक कार धडकल्याने थेट नदीत पडली. गाडीत चार जण होते. ही घटना बुधवारी रात्री उशिरा 1.10 वाजेच्या सुमारास घडली.
 
पोलिसांनी सांगितले की भारतीय तटरक्षक दल, नौदल, अग्निशमन आणि आपत्कालीन सेवा आणि गोवा पोलिसांनी कार आणि त्यातील प्रवासी शोधण्यासाठी ऑपरेशन सुरू केले.
 
भरधाव वेगात आलेल्या एसयूव्ही कारने दुसऱ्या वाहनाला ओव्हरटेक केले आणि नंतर नदीत पडल्याचे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले. गाडीत किमान चार जण होते.
 
कार एक महिला चालवत असल्याचे सांगितले जात आहे. हा पूल दक्षिण गोव्यातील मडगाव आणि पणजी शहरांदरम्यान राष्ट्रीय महामार्गावर आहे.