गुरूवार, 26 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: गुरूवार, 28 जुलै 2022 (08:26 IST)

मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंकडून शिवसेनेतील नव्या नियुक्त्या जाहीर

eknath shinde
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपल्या गटाकडून शिवसेनेतील नव्या नियुक्त्या जाहीर केल्या आहेत. संबंधित नेत्यांना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते नियुक्तीपत्रेही देण्यात आली आहेत.
 
यामध्ये जाहीर केल्याप्रमाणे आमदार दीपक केसरकर हेच पक्षाचे मुख्य प्रवक्ते म्हणून कायम राहणार आहेत. तर कामगार नेते किरण पावसकर यांची सचिवपदी नियुक्ती करण्यात आली.
 
ठाण्याचे माजी महापौर संजय मोरे यांचीही शिवसेना सचिव पदावर नियुक्ती करण्यात आली. याशिवाय शिवसेनेचे उपनेते गुलाबराव पाटील, आमदार उदय सामंत, किरण पावसकर आणि दहिसरच्या माजी नगरसेविका शीतल म्हात्रे यांची प्रवक्तेपदी निवड करण्यात आलेली आहे.
 
याचबरोबर अंबरनाथचे आमदार डॉ. बालाजी किणीकर यांची पक्षाच्या खजिनदारपदी नियुक्ती करण्यात आली आहे.
 
एकीकडे, एकनाथ शिंदे विरुद्ध उद्धव ठाकरे हा वाद निवडणूक आयोगाकडे गेल्यामुळे पक्ष चिन्ह कुणाला मिळणार याबाबत प्रश्न निर्माण झाला आहे. पण एकनाथ शिंदे आपल्या बाजूने पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या करण्याचं काम युद्धपातळीवर करताना दिसत आहेत.