प्रशासकीय अधिकाऱ्यांसाठी लवकरच होणार ‘हा’ निर्णय
राज्यभरातील प्रशासकीय सेवेत असलेल्या अधिकाऱ्यांसाठी मोठी आणि महत्वाची बातमी आहे. प्रशासकीय अधिकारी पदोन्नती आणि बदल्यांची वाट पाहत होते.आता हा मार्ग मोकळा होण्याचे संख्येत दिसत आहेत याबाबत शिंदे सरकारने भूमिका घेतली असून राज्यातील मंत्रिमंडळ विस्तारानंतर तसेच पावसाळी अधिवेशनानंतर पोलीस तसंच सामान्य प्रशासन विभागाच्या अंतर्गत येणाऱ्या महत्त्वाच्या बदल्या केल्या जाणार असल्याची माहिती मिळाली आहे.
तत्कालीन ठाकरे सरकारने 30 जून पर्यंत बदल्या करू नये असा शासकीय अध्यादेश काढला होता. मे महिन्याच्या अखेरपर्यंत राज्यात सर्वत्र पदोन्नती आणि कार्यकाळ संपलेल्या अधिकाऱ्यांच्या नियमानुसार बदल्या आणि प्रमोशन होत असते.परंतु राज्यात राज्यसभा आणि विधान परिषदेची निवडणूक पाहता पक्षांतर्गत आमदारांची नाराजी नको यासाठी एक महिना बदल्यांना मुदत वाढ देण्यात आली होती . दिलेल्या मुदतीआधीच राज्यात महाविकास आघाडी सरकार कोसळले.
त्यानंतर मुख्यमंत्री पदावर एकनाथ शिंदे यांची वर्णी लागली असली तरी अद्याप पर्यंत मंत्रिमंडळ विस्तार झालेला नाही.त्या मुळे या प्रशासकीय अधिकारी पदोन्नती आणि बदल्यांना विलंब झाला. मंत्रीमंडळ विस्तार रखडल्याने प्रशासकीय सेवेतील अधिकारी बदल्या कधी होणार याची वाट पहात होते .संदर्भात प्रशासकीय अधिकारी संघटनांचे प्रतिनिधी यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे तसेच मुख्य सचिव मनू कुमार श्रीवास्तव यांची भेट घेतली.
या बैठकीनंतर राज्यातील मंत्रिमंडळ विस्तार खाते वाटप झाल्यानंतर पावसाळी अधिवेशन होणार असून सर्वसाधारण बदल्या आणि पदोन्नती केल्या जातील असं सांगण्यात आल्याची माहिती सुत्रांकडडून मिळाली आहे. त्यामुळे आता रखडलेल्या बदल्या आणि पदोन्नती साठी वाट पाहत असलेल्या अधिकाऱ्यांना आता मंत्री मंडळ विस्ताराची वाट पहावी लागणार आहे