मंगळवार, 26 नोव्हेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: शुक्रवार, 30 जुलै 2021 (14:22 IST)

CBSE 12th Result 2021 निकाल जाहीर, 99.37 टक्के उत्तीर्ण, मुलींनी बाजी मारली

मुख्य बिंदू
 
सीबीएसई 12 वी बोर्ड मध्ये 
99.37% विद्यार्थी उत्तीर्ण
99.67% निकालासह मुली अव्वल
99.13 टक्के विद्यार्थी परीक्षेत उत्तीर्ण झाले
14 लाखाहून अधिक विद्यार्थ्यांनी केलं होतं रजिस्ट्रेशन
 
सीबीएसई बारावीचा निकाल जाहीर. केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाने (सीबीएसई) दहावीच्या, बारावीच्या विद्यार्थ्यांची रोल क्रमांक जाहीर केल्यानंतर दुसर्‍याच दिवशी आता सीबीएसईचा १२ वीचा निकाल शुक्रवारी जाहीर करण्यात आला आहे. मंडळाने जारी केलेल्या अधिकृत निवेदनानुसार, बारावीचा निकाल आज दुपारी 2 वाजता जाहीर करण्यात आला आहे.
 
येथे क्लिक करुन बघता येईल परिणाम 
 
परिणाम जाहीर, सीबीएसईने अॅक्टिव्ह केली लिंक
 
या वेळी पर्यायी मूल्यांकन योजनेअंतर्गत गुण देण्यात आले आहेत, त्यामुळे सीबीएसई विद्यार्थ्यांना गुणांची फेरतपासणी करण्याची विनंती करू देणार नाही अशी शक्यता आहे. सीआयएससीईने विद्यार्थ्यांना पुन्हा तपासणीसाठी अर्ज करण्याची परवानगी दिली नाही. तथापि, विद्यार्थी गणना पडताळणीसाठी अर्ज करू शकतात.